छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचे पूर्ण वर्चस्व, सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती पदावरही भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाची निवडणूकही बिनविरोध होणार आहे. Sambhajinagar Zilla Parishad

महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून वरून पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने त्यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे.



भाजपने मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापती पदासाठी संधी दिली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के आणि अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत सचिन गरड यांचाही समावेश आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना गट एकत्र येऊन भाजपविरोधात समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवले. यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोंणगावकर यांनी पक्षाचा ‘व्हीप’ झुगारत उमेदवारी अर्ज विकत घेतला. यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेत तुमचे आणि भाजपचे पटत नसेल, तर तटस्थ राहण्याऐवजी मला मतदान करून मदत करा, असे म्हटले. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे आता भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

BJP Secures Total Control of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad, Chairperson Elected Unopposed

महत्वाच्या बातम्या