विशेष प्रतिनिधी
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात तब्बल २३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही लढत अधिकच चुरशीची ठरणार आहे. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडतं आहे.
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असताना एवढ्या मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार एकाच वेळी मैदानात उतरणे हे विशेष मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न, नाराजी आणि राजकीय समीकरणे यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर ही निवडणूक केवळ परंपरागत बालेकिल्ल्याची प्रतिष्ठा टिकवण्याचीच नाही, तर स्थानिक असंतोष आणि मतदारांच्या बदलत्या भूमिकेचीही कसोटी ठरणार आहे. बारामतीच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार पवार कुटुंबाच्या विरोधात उभे ठाकल्याने या लढतीकडे राज्यभरातून उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावर माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात नाहीत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्तअपक्ष उमेदवारच रिंगणात आहेत.
माघारीनंतर अंतिम उमेदवारांची नावे आणि चिन्ह पुढीलप्रमाणे:
* सुनेत्रा अजित पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, घड्याळ
* घुटुकळे आर वाय, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, शिट्टी
* सतीश कदम, हिंदुस्तान जनता पार्टी, हिरा
* डॉ अभिजीत बिचूकले, अपक्ष, दूरदर्शन
* अविनाश गायकवाड, अपक्ष, साखळी
* करुणा मुंडे, अपक्ष, एअर कंडिशनर
* गजानन गवळी, अपक्ष, लिफाफा
* चंद्रकांत मोरे, अपक्ष, कॅमेरा
* चंद्रकांत वाघमोडे, अपक्ष, प्रेशर कुकर
* दत्तात्रय बेद्रे, अपक्ष, सीसीटीव्ही, कॅमेरा
* बाळासो धापटे, अपक्ष, सफरचंद
* रोहित भोसले, अपक्ष, बॅट
* मिथुन आटोळे, अपक्ष,बुद्धिबळपट
* मंगलदास निकाळजे, अपक्ष,फळांची टोपली
*योगेश मोहन, अपक्ष, बासरी
* डॉ विजयकुमार भिसे, अपक्ष, रोड रोलर
* विराज शिंदे, अपक्ष, गॅस सिलेंडर
* शिवाजी कोकरे, अपक्ष, ट्रक
* सतीश सोनवणे, अपक्ष,खाट
* सागर भिसे, अपक्ष, ट्रंपेट
* साजन अडसूळ, अपक्ष, किटली
* सिताराम रणदिवे,अपक्ष, बॅटरी टॉर्च
* सोनाली राणे, अपक्ष, कपाट
Baramati Candidates Challenge Pawars in Baramati for the First Time
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर