विशेष प्रतिनिधी
अमरावती : विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून जिवानिशी ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणीर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या ‘कुरळपूर्णा’ येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी इसमाने मिळून अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याबाबत चर्चा केली होती. या संभाषणाचे रेकॉर्डिंग एका गोपनीय साक्षीदाराने आपल्या मोबाईलमध्ये केले होते, जे आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू (५६, रा.कुरळपूर्ण) गोलू माहोरे (५०) – रा. आशेगाव. एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अभिजीत तायडे यांनी संभाषणाची रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांना दिला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले की प्रथमदर्शनी रेकॉर्डिंगमधील तथ्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ते न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. ज्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्डिंग झाले, तो ओरिजनल डिव्हाइस जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला जाईल.
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. बच्चू कडू यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला.
या हायप्रोफाईल गुन्ह्यामुळे अचलपूर आणि चांदूरबाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
Case registered against former MLA Bachchu Kadu for conspiracy to commit murder
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर