विशेष प्रतिनिधी
पुणे: बारामती विधानसभा पोटनिवणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आज दुपारी 3 पर्यंत आहे.आत्तापर्यंत जवळपास 53 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे किती उमेदवारांकडून निवडणुकीतून माघार घेतली जाते,हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. काल निवडणूक बिनविरोध व्हावी ह्यासाठी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. Sunetra Pawar
आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती.त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विधान केले आहे.
रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्यानंतर त्यांना निवडणूक बिनविरोध व्हावी,ह्यासाठी विनंती केली.त्यामुळे काँग्रेस आज उमेदवारी अर्ज मागे घेणार का?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले की,आम्ही बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कालच चर्चा केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. आज सकाळी देखील प्रदेशाध्यक्ष सोबत चर्चा झाल्यानंतर आम्ही बारामती मधून अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय आम्ही हाय कमांडला सांगणार आहोत. दिल्लीतील हाय कमांडकडून आदेश आल्यानंतर बारामती मधील अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
अर्ज मागे घेण्यावरून काँग्रेसमध्ये असमन्वय
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून बारामती पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय झाला असला तरी, अजूनही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अर्ज मागे घेण्याबाबत असमन्वय असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे अध्यक्ष पल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या हाय कमांड सोबत चर्चा सुरू केली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी 3 पर्यंत आहे.त्यामुळे पुढील 2 ते 2.30 तासात नेमकं काय घडत?हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज आगे घेण्याबाबत ठाम निर्णय घेतला जातो का? बारामती पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 53 उमेदवारी अर्ज पैकी किती अर्ज मागे घेतले जातात, ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Sunetra Pawar
Congress withdraws from Baramati! Sunetra Pawar’s path is clear..
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर