Padalkar : नाशिकमध्ये कर्मचारी महिलांचा छळ;पडळकरांनी काय सांगितलं?

विशेष प्रतिनिधी

नाशिक:Padalkar शहरातील एका मल्टिनेशनल कंपनीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.कंपनीतून महिला कर्मचाऱ्यांना लक्ष करून त्याचा छळ केल्याचा व गैरफायदा घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित प्रकरणाचा खुलासा केला आहे.Padalkar

पडळकर म्हणाले की,आजपर्यंत आपण लव्हजीहाद, लँडजिहाद संदर्भात घटना पाहिलेल्या आहेत.मात्र नाशिक मधील एका मल्टिनेशनल आयटी कंपनीत “कॉर्पोरेट जिहाद”सुरू असल्याचे आरोप पडळकर यांनी यावेळी केले.Padalkar



पडळकर म्हणाले की,या कंपनीत जवळपास १३९ मुली उच्चपदावर काम करत होत्या,मात्र ह्यातील हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन त्याचं शोषण केलं जात होत.कंपनीतील टीम लीडर असलेल्या जिहाद प्रवृत्तीच्या मुलांकडून ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केल्या जात होत. अन्यायाला आणि छळाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने अनेक मुलींनी नोकरी सोडली.मात्र 9 मुलींनी समोर येऊन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.नाशिक शहरातील 9 वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल झालेल्या आहेत.

मुलींना मलेशिया मध्ये विक्री करण्याचा कट

कंपनीतील टीम लीडर असलेल्या मुलांनी संबंधित मुलींना फिरण्यास जाण्याचे आमिष दाखवले.पुण्यातील इमॅजिका वॉटर पार्क येथे घेऊन जात अनेक मुलींवर अत्याचार केला.धर्मांतरण केलेल्या मुलींना मलेशिया येथे विक्री करण्याचा कट देखील जिहादी प्रवृत्तीच्या टीम लीडर कडून आखण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी केला.

नाशिक पोलिसांकडून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणल्यानंतर राज्यसरकारकडून एस आय टी देखील स्थापन करण्यात आली आहे.

Harassment of female employees in Nashik; What did Padalkar say?

महत्वाच्या बातम्या