समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार पेटल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कार तब्बल १०० फूट फरफटत गेली.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव पवन अजमेरा (वय ५२, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. तर ईशा पवन अजमेरा (वय २०) आणि विना पवन अजमेरा (वय ४७) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



अपघातानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चालकाचे पाय अडकले असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच अचानक कारच्या पुढील भागाने पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. या भीषण आगीत चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

Horrific accident on Samruddhi Expressway, driver burnt alive as car catches fire

महत्वाच्या बातम्या