विशेष प्रतिनिधी
पुणे:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील तब्बल ६० ते ७० महिलांचा हफ्ता बंद झाला आहे.लाडकी बहीण योजनेचा हफ्ता का बंद झाला,ह्याच कारण अजूनही महिलांना कळलेलं नाहीये.जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता का बंद झाला ह्याचे स्पष्टीकरण देण्यात येणार आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र अलीकडे करण्यात आलेल्या छाननीनंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असून, त्यामुळे लाखो महिलांचे हप्ते थांबले आहेत.
हफ्ते बंद होण्यामागील कारण काय?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांनी वेळेत केवायसी पूर्ण केली नसल्याची माहिती समोर आली आहे.नाव,आधार क्रमांक आणि बँक खाते यांमध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ
अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी नंतर लाभ बंद झाला आहे. केवायसी दुरुस्तीसाठी आता तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना उद्देशून सांगितले की,महिलांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये,तसेच नव्याने नोंदणीकृत महिलांची नोंदणी सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाहीये.महिलांनी स्वतः मोबाईलवरून इ केवायसी करावी किव्वा जवळच्या अंगणवाडी सेविकेची मदत घेण्याची आव्हान अदिती तटकरे यांनी केले आहे.
Installment for Your ‘ladki bahin’ Halted! Get Information from ‘This’ Nearby Office.
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..