विशेष प्रतिनिधी
बीड : नाशिकमध्ये पोलिसांनी उघडकीला आणलेले आयटी कंपनीतील प्रकरण अतिशय गंभीर आहे, एखाद्या टेक्निकल कंपनीमधे अशाप्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे.
Devendra Fadnavis
त्यामुळे या सगळ्याचा सखोल तपास केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.Devendra Fadnavis
नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून सखोल चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Devendra Fadnavis
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सदर कंपनीत साधारणतः 2022 ते 2026 या कालावधीत गुन्हे घडल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, यातील एक गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आहे, तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. सदर कंपनीत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, लैंगिक व
मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले. त्यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे.
IT Company Case Serious, Will Be Thoroughly Probed: CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर