Danish and Friend : दानिश आणि त्याच्या मैत्रिणीच्या वैयक्तिक वादातून निरपराध कर्मचाऱ्यांना गोवले, नाशिक टीसीएस बीपीओ प्रकरणात दावा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Danish and Friend  “माझ्या पतीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. दानिश आणि त्याच्या मैत्रिणीच्या वैयक्तिक वादातून अनेक निरपराध कर्मचाऱ्यांना गोवण्यात आले आहे,” असा दावा नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( Tata Consultancy Services (टीसीएस) बीपीओ प्रकरणातील अटकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणात महिलांवरील लैंगिक शोषण, विनयभंग, मानसिक अत्यार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.Danish and Friend

या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख याच्यावर बलात्काराचा आरोप असून, त्याच्याविरोधातील तक्रारीनंतर इतर महिलांनीही पुढे येत तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे नोंदवत कारवाई केली आहे. दरम्यान, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची कंपनी स्तरावर सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगत संबंधित सात कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले आहे.Danish and Friend



अटकेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माध्यमांशी बोलताना सांगितले की, दानिश शेख आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते आणि ते बिघडल्यानंतरच हा वाद उफाळून आला. कंपनीतील अनेकांना त्यांच्या संबंधांची माहिती होती. माझ्या पतीने सांगितले की, तक्रारदार महिला तिचे काम संपल्यानंतर दानिशची अनेक तास वाट पाहत बसत असे. दानिशबद्दल तिला जवळीक वाटत असल्यामुळे तक्रारदार महिलेने रमजान महिन्यात उपवास ठेवणे आणि त्यापद्धतीचे कपडे घालण्यास सुरुवात केली होती. ज्याचा तिच्या पालकांना प्रचंड त्रास होत होता. फेब्रुवारीत त्यांच्यात वाद झाल्यानंतर तक्रारदार महिलेच्या कुटुंबीयांनी एका स्थानिक राजकीय नेत्याची मदत घेत पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला,” असे ती म्हणाली.

या महिलेच्या म्हणण्यानुसार तिचे पती बीपीओमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते आणि त्यांचा दानिश शेखशी केवळ औपचारिक संपर्क होता. “मार्चच्या शेवटच्या आठवड्यात माझे पती सुट्टीवर होते. त्यांना परत बोलावण्यात आले. १ एप्रिल रोजी पोलिसांनी स्वाक्षरीसाठी बोलावले. ते सायंकाळी पोलीस ठाण्यात गेले, मात्र काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली,” असा आरोप तिने केला.

तिने सांगितले की, “आम्हाला ११ वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा आहे. माझे पती कुटुंबवत्सल आहेत. त्यांनी कधीही अशा प्रकारचे वर्तन केले नाही. धार्मिक भावना दुखावल्याचे आरोपही पूर्णपणे निराधार आहेत.”

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तक्रारीनंतर इतर महिलांनीही पुढे येत तक्रारी दिल्या असून त्याआधारे गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे.

Personal Dispute Between Danish and Friend Led to Innocent Employees Being Framed

महत्वाच्या बातम्या