अतिक्रमणावर पुणे महापालिकेचा हातोडा; ३७,६८० चौ.फूट जागा झाली मोकळी!

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे महाजपालिकेकडून शहरातील सर्वच बांधकामावर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.या कारवाईत शहरातील तब्बल ३७,६८० चौ.फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.२ एप्रिल रोजी शहराच्या विविध विविध भागात भागात एकाच दिवशी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. Pune Municipal Corporation

महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम नियंत्रण विभागाकडून एक संयुक्त पथक तयार करून सकाळपासूनच ही कारवाई करण्यात आली.सदर कारवाईत बाणेर,बालेवाडी,कोथरूड,वारजे माळवाडी,कोंढवा तसेच नगर रोड आणि हडपसर परिसरातील विविध ठिकाणी व्यावसायिक दुकाने तर बऱ्याच ठिकाणी रहिवासी स्वरूपाची बांधकामे बेकायदेशीर उभी करण्यात आली होती.



महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक बांधकामे ही विनापरवाना आणि बेकायदेशीर उभारण्यात आली होती,तर काहींनी मर्यादेबाहेर मजले आणि शेड्स उभारल्या होत्या.यासंदर्भात अनेकवेळा नोटीस देऊन देखील कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर कठोर कारवाई करण्यात आली.

अतिक्रण मोहीम राबवताना परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.काही भागातील स्थानिक नागरिकांकडून विरोध देखील करण्यात आला,मात्र प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई करण्यात आली.

महापालिकेकडून इशारा देण्यात आला आहे की,शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम उभारले जाऊ देणार नाही.बांधकाम करण्यापूर्वी नागरिकांनी परवाना घेणे बंधनकारक असून,नियमांचे उल्लंघन केल्यास इथून पुढे देखील कारवाई करण्यात येणार आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यामुळे,रस्ते मोकळे होण्यास आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.अशा विश्वास यावेळी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation cracks down on encroachment; 37,680 sq ft of land has been vacated!

महत्वाच्या बातम्या