पुणे महापालिकेचा कर वसुलीवर भर;थकबाकीदारांवर होणार कठोर कारवाई!

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचा आढावा बैठक घेण्यात आली.अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.बैठकीत विभागाच्या कार्यपद्धती,महसूल वाढीचे नियोजन तसेच थकबाकी आणि वसुलीबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत कर आकारणी व कर संकलन विभागाने PPT सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामकाजाचा आढावा मांडला.सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा मिळकतकर देयके तयार करून छपाई व वितरण प्रक्रिया संदर्भात माहिती देण्यात आली.मिळकतदारांना कर भरण्यासाठीची लिंक आणि एसएमएस आणि व्हाट्सअप द्वारे पाठविण्याचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात आले.



थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा

अभय योजना लागू केल्यानंतरही काही थकबाकीदारांनी कर न भरल्याचे समोर आल्याने मोठ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत असलेल्या प्रकरणांमध्ये पुढील २ महिन्यात जप्तीची कारवाई, नळ कनेक्शन तोडणे अशा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

३८५० कोटींचे उद्दिष्ट

सन २०२६-२७ या वर्षासाठी जवळपास ३८५० कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.कर वसुली प्रक्रियेकडे लक्ष देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

डिजिटल यंत्रणेला महत्व

नागरिकांना मिळकतकरची देयके व संबंधित सूचना त्यांचा नोंदणीकृत मोबाईलवर वेळेवर मिळाव्यात यासाठी डिजिटल प्रणाली सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. ए-फॉर्म स्कॅनिंगनचे काम लवकर करण्याचा देखील प्रयत्न आहे.

तक्रार निवारणावर भर

करदात्यांचा तक्रारी लक्षात घेऊन समाधानकारक पद्धतीने सोडवण्याचे आदेश देण्यात आले.रखडलेली प्रकरणे वेळेत सोडवून प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पुणे महापालिकेने येत्या आर्थिक वर्षात महसूल वाढीसाठी आक्रमक धोरण स्वीकारले असून थकबाकीदारांवर कठोर कारवाईसह डिजिटल प्रणालीद्वारे कर वसुली अधिक वेगाने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation focuses on tax collection; strict action will be taken against defaulters!

महत्वाच्या बातम्या