विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: Samrajit Ghatge विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP-SP) प्रवेश केलेले समरजीत घाटगे आता पुन्हा एकदा ‘स्वगृही’ परतणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात घाटगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.Samrajit Ghatge
समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आपण स्वगृही परतणार असल्याचे स्वतः समरजित घाटगे यांनी सांगितले आहे.Samrajit Ghatge
घाटगे म्हणाले, “भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मूळ पक्षात परत आल्याचे मला मोठे समाधान आणि अभिमान वाटत आहे.”
समरजित घाटगे म्हणाले. “देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ नेते नाहीत, तर ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. पक्षातून बाहेर पडल्यानंतरही मी नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
समरजित घाटगे यांनी सांगितले की, “मी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महापालिका निवडणुकीनंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्यांना मांडली होती. शरद पवारांना पूर्वकल्पना देऊनच मी ही पुढची पावले उचलली आहेत.”
samrajit ghatge quits ncp set to return to home-turf
महत्वाच्या बातम्या
- डोंबिवली अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची करा; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
- गुरुवारच्या पावसानं महापालिकेचे वाभाडे काढले;ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालणार!
- बारामतीत पोटनिवडणुकीत काँग्रेसची ‘एंट्री’; प्रशांत जगतापांनी स्पष्ट सांगितलं!
- बारामतीला पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे नुकसान; जय पवार थेट बांधावर!