विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र आज देशातील ‘स्पोर्ट्स पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जात आहे. खेलो इंडिया युथ गेम्स, नॅशनल गेम्स आणि नॅशनल स्कूल गेम्स या तिन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध संघांनी आपले जेतेपद कायम ठेवत अव्वल स्थानाकडे वाटचाल केली आहे. Sunetra Pawar
जागतिक पातळीवर महाराष्ट्रानी आपला अपूर्व ठसा क्रीडा क्षेत्रातही उमटवावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राने ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार केली असून शहरांसमवेत ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडावेत यासाठी तालुका स्तरावर ५ कोटी, जिल्हा स्तरावर २५ कोटी आणि विभागीय स्तरावर ५० कोटी रुपयांचे क्रीडा संकुल शासन साकारत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
कोराडी येथील सेवानंद विद्यालय मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार सुबोध मोहिते, नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक व मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना सक्षम व्यासपीठ आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यातील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. विदर्भातील ग्रामीण खेळाडूंना चांगल्या दर्जाचे क्रीडा शिक्षण मिळावे, अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी मानकापूर येथे ७४६ कोटी रुपये निधीतून महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ साकारत आहे. नागपूर मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी एक चांगले वातावरण तयार झाले असून संकेत बावनकुळे यांनी राज्यपातळीवरच्या कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आयोजकांबद्दल समाधान व्यक्त केले.
स्व. अजित दादांनी कबड्डी या खेळाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा आणि त्यांनी निर्माण केलेला उज्वल वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. खेळाडूंना केवळ मैदानावरील सुविधाच नाही, तर मैदानाबाहेरील सुरक्षितता देणेही आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच गुणवंत खेळाडूंना १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत २५ वाढीव गुणचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूना आरक्षण ठेवले आहे. त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी आपण ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. त्यांना थेट आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण देणारी प्रणाली शासन राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
Strategic blueprint prepared by Maharashtra sports department for Olympic campaign, Sunetra Pawar says
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन