धनुष्यबाण वादावर निर्णय लांबला; सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 30 जुलै

विशेष प्रतिनिधी

पुणे: आज रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही बाजूंचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर,बेजबाबदार विधान टाळा अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची कानउघडणी केली.शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता ३० जुलै रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून प्रकरणाच्या सुनावणीस विलंब होत असल्याबाबत माध्यमांमधून व्यक्त करण्यात येणाऱ्या नाराजीची दखल न्यायालयाने घेतली. यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितले की, “हे प्रकरण गेली तीन वर्षे न्यायालयात सुरू आहे. आम्ही या विषयावर गंभीरपणे सुनावणी करत आहोत. त्यामुळे कोर्टाच्या प्रक्रियेबाबत माध्यमांमधून किंवा सार्वजनिकरीत्या बेजबाबदार वक्तव्ये करणे योग्य नाही.”



दरम्यान, ठाकरे गटाने या प्रकरणात तातडीने अंतिम निकाल देण्याची मागणी केली होती. त्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्याबाबतही न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रलंबित मुद्दे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्णपणे ऐकल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटाला तातडीचा दिलासा मिळालेला नाही.

पुढील तारीख ३० जुलै ला..

या सुनावणीत न्यायालयाने पुढील तारीखही जाहीर केली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, याबाबतचा अंतिम निर्णय आणखी पुढे ढकलला गेला आहे.

Decision on bow and arrow dispute delayed; next hearing in Supreme Court on July 30

महत्वाच्या बातम्या