शासकीय कामात दिरंगाई पडली महागात; पुण्यातील ८ शिक्षकांवर गुन्हा…

विशेष प्रतिनिधी

पुणे: शासकीय कामात कामचुकारपणा आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कणखर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.केंद्र सरकारच्या आगामी जनगणना २०२७ साठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या या आयोजित प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे फुरसुंगी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकासह ८ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फुरसुंगी पोलिस ठाण्यात याप्रकरणात तक्रार देण्यात आली आहे.

देशात सध्या जनगणनेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू आहे.या जनगणनेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात सरकारी शिक्षकांवर टाकण्यात आली असून,शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.शिक्षकांना जनगणनेबाबत प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे.



दरम्यान,हडपसर – फुरसुंगी नगरपरिषद हद्दीत जनगणनेच्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे.सदरील या मोहिमेसाठी संपूर्ण १६ प्रभागांमध्ये २८४ प्रगणक आणि ३६ सुपरवायझर सोबत एकूण ३२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्त कर्मचाऱ्यांना काम समजावून सांगण्यासाठी २३ ते २५ एप्रिल दरम्यान विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिरासाठी फुरसुंगीमधील एक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश आले होते.मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी याकडे पुराने दुर्लक्ष केले आणि वारंवार सूचना देऊनही उपस्थित राहिले नाहीत.शेवटी नगरपरिषद कर अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली.

याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यात शाळेतील मुख्याधपक,शिक्षक आणि क्रीडाशिक्षकांचा समावेश आहे.

Delays in government work cost money; Crime against 8 teachers in Pune…

 

महत्वाच्या बातम्या