विशेष प्रतिनिधी
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज बारामती मध्ये पोट निवडणूक होत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे,यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जय पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जय पवार म्हणाले की,बारामती मतदार संघातील नागरिकांची मागणी आहे की मी २०२९ मध्ये उमेदवार असावं, पण माझ्या मनात पक्षासाठी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे.
अजित पवार यांच्या अपघात अहवालाविषयी बोलताना जय पवार म्हणाले की, ‘ अपघात संदर्भात अहवाल यायला अजून पूर्ण एक वर्ष लागणार आहे.तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी आम्ही वेगवेगळ्या यंत्रणांकडे करतोय. सीआयडीची टीम देखील चांगलं काम करत आहे.आमचा संपर्क त्यांच्याशी आहे ‘.
जय पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की ते तपासात लक्ष घातलील. अपघाता संदर्भात जोपर्यंत खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत घातपात की अपघात, हे स्पष्ट होणार नाही.मी लोकांची दिशाभूल करणार नाही.आपण जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत थांबूया.सर्व यंत्रणांकडून व्यवस्थित तपास केला जातोय, असे देखील जय पवार यांनी स्पष्ट केले.
Is Jai Pawar interested in 2029 from Baramati? Jai Pawar made a disclosure..
महत्वाच्या बातम्या