माणिक बाग ते एसएनडीटी मेट्रो मार्गाला गती;कधी होणार काम सुरू?

विशेष प्रतिनिधी

पुणे:शहरातील वाढत्या वाहतूककोंडीला फाटा देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘ माणिकबाग एसएनडीटी मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.या प्रकल्पाबद्दल माहिती देताना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून पुढच्या ४ वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

शहरातील वारजे,कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता या परिसरात मागच्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.या पार्श्वभूमीवर तब्बल ७ हजार ४५७ कोटी रुपयांचा ‘ माणिक बाग ते एसएनडीटी ‘ मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे,यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.



या प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की,सर्वेक्षण आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे,तर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार आहे.

प्रमुख मेट्रो स्थानके कोणती?

माणिकबाग ते एसएनडीटी या शहराच्या मध्यवर्ती भागातून होणाऱ्या मेट्रो महामार्गावर एकूण ४ मेट्रोस्थानक असणार आहेत.

कर्वेनगर: क्रोमा शोरुम समोर

वारजे: रामचंद्र पाटील चौधरी शाळेसमोर

डहाणूकर कॉलनी:जनता सहकारी बँक

कर्वे रस्ता:करिष्मा चौक

उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,शहरातील रस्ते सतत वाढवणे शक्य नाही.त्यामुळे मेट्रो आणि बस हेच भविष्यातील प्रभावी पर्याय आहेत.नागरिकांना योग्य मोबदला देण्यात आल्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

माणिकबाग – एसएनडीटी या शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मेट्रो महामार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे,त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Manik Bagh to SNDT Metro line gets underway; when will work start?