Pune Airport पुणे विमानतळाची ऐतिहासिक कामगिरी; ACI ASQ सर्वेक्षणात सलग दोन तिमाहींमध्ये प्रथम क्रमांक

निरंजन शेरकर

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवासी सेवा गुणवत्ता क्षेत्रात मोठी कामगिरी करत ACI एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) सर्वेक्षणात Q3 (जुलै–सप्टेंबर 2025) आणि Q4 (ऑक्टोबर–डिसेंबर 2025) या दोन्ही तिमाहींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 5 पैकी 4.96 असा अपवादात्मक गुण मिळवत पुणे विमानतळाने प्रवासी समाधान, सेवा गुणवत्ता आणि व्यवस्थापन उत्कृष्टतेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. Pune Airport

या यशामुळे पुणे विमानतळाची ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विमानतळांमध्ये अग्रस्थानावर पोहोचली आहे. प्रवाशांच्या अनुभवावर आधारित या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात वेळेवर सेवा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवासी सोयी-सुविधा, कर्मचारी वर्तन, डिजिटल सेवा आणि एकूणच प्रवासी अनुभव या महत्त्वाच्या निकषांवर पुणे विमानतळाने सर्वोच्च गुण मिळवले आहेत.

हे यश विमानतळ प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, एअरलाईन्स कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग टीम, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या अखंड मेहनतीचे फळ आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधत उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या यशामुळे पुणे विमानतळाच्या भविष्यातील विस्तार योजनांना अधिक बळ मिळणार आहे. प्रवासी क्षमतेत वाढ, नवीन टर्मिनल सुविधा, स्मार्ट एअरपोर्ट प्रणाली, पर्यावरणपूरक उपक्रम आणि डिजिटल सेवा यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

Pune Airport’s historic achievement; Ranked first in ACI ASQ survey for two consecutive quarters

महत्वाच्या बातम्या