पुणे महानगरपालिकेची जनगणना 2027 तयारी वेगात; फील्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण पूर्ण

विशेष प्रतिनिधी

पुणे:देशात होणाऱ्या जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात घर यादी गट व घर गणना प्रक्रियेची सुरुवात 16 मे 2026 पासून होणार आहे.या अनुषंगाने महापालिकेकडून फील्ड स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमात फील्ड ट्रेनर चे पहिल्या प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षणा दरम्यान फील्ड वर्क देखील करून घेण्यात आले.



यावेळी संपूर्ण प्रक्रियेला आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांची फील्ड ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे. फील्ड ट्रेनर ला मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर ला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.

यापुढील टप्प्यातील बॅच तीन आणि चार साठी उद्यापासून तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू होणार आहे.यावेळी आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की,या सर्व उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.नागरिक,गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, शाळा आणि महाविद्यालयांनी जनगणना प्रक्रिया सहकार्य करावे.यंदाच्या जनगणनेत प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्व गणना या पर्यायाचा नागरिकांनी वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया असून,प्रत्येकाने सक्रिय समभाग नोंदवून सहकार्य करावे,असे आवाहन पुणे महानगरपालिकेने नागरिकांना केले.

Pune Municipal Corporation’s Census 2027 preparations in full swing; Training of field trainers completed

महत्वाच्या बातम्या