Savarkar’ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे माझी जन्मठेप हे पुस्तक कपोलकल्पित नाही!

विशेष प्रतिनिधी

पुणे : Savarkar’ पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयामध्ये मा. न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या समोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते  राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी पार पडली. खटला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर
यांनी दाखल केला आहे.Savarkar’

आजच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांच्या वतीने ॲड.मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणी मध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रश्नोत्तरं झाली. उलटतपासणी दरम्यान सात्यकी सावरकर यांनी न्यायालयासमोर मान्य केले की, राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेले भाषण खरे अथवा खोटे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी पक्षावर आहे.Savarkar’



तसेच राहुल गांधी यांना कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा खुलासा मागविण्याची संधी न देता थेट न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी कबूल केले.

तसेच त्यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री. अरूण शौरी तसेच जेष्ठ पत्रकार श्री. निरंजन टकले यांनी सावरकरां विषयी बदनामीकारक

लिखाण केल्याचे सांगून मात्र त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच बरोबर अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरां व्यतिरिक्त इतर अनेक क्रांतिकारकांनीही कठोर शिक्षा भोगल्या, त्याग केला आणि बलिदान दिले, मात्र त्यांची लोकप्रियता तुलनेने कमी का राहिली याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सात्यकी सावरकर यांनी “त्या क्रांतिकारकांवर कमी प्रमाणात संशोधन झाले, त्यामुळे ते लोकप्रियतेपासून दूर राहिले,” असे उत्तर दिले.

तसेच माझी जन्मठेप या पुस्तकातील घटना म्हणजे कोलू फिरवला, काथ्या कुटला, दगडावर कविता लिहल्या या घटनांना पुरावे नाहीत म्हणून त्या पुस्तकातील घटना कपोलकल्पित असून वास्तवाशी धरून नाहीत हे खरे नाही असे न्यायालयात सांगितले

आज न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्यामुळे सुनावणी अपूर्ण राहिली असून खटला पुढील तारखेसाठी तहकूब करण्यात आला आहे. पुढील तारीख ३० एप्रिल २०२६ ही आहे.

Savarkar’s ‘My Transportation for Life’ Not Fiction, Claims Assert

महत्वाच्या बातम्या