विशेष प्रतिनिधी
पुणे : Chandrakant Patil जर ते महायुती सोबत आले नाहीत गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे, कोल्हापूर सोडून द्या, ठाकरेंना मुंबईतही उमेदवार मिळणार नाहीत, असा दावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत केला आहे.Chandrakant Patil
पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करावी. जर ते आमच्या सोबत आले नाहीत तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत. अर्थात त्यांनी यायचं की नाही, त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाही. याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागलेत? मी एक अंदाज वर्तवला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रायगडावरील दौऱ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत 500 पानी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पाहून संजय राऊत यांना चक्कर येईल. अनेक संदर्भ गोळा करुन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एवढा अभ्यास अमित शाह यांचा आहे. पुस्तक तयार आहे फक्त त्याचे प्रकाशन दिल्लीमध्ये करायचे की पुण्यामध्ये करायचे हे ठरणे बाकी आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यंदाची निवडणूक ही बंडखोरीचे राजकारण झाल्यामुळे प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र यामध्ये शरद पवार गट, ठाकरे गट व कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला. अगदी यामध्ये विरोधी पक्षनेते पदावर देखील कोणत्याही विरोधी पक्षाला दावा करता आला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला सत्तेमध्ये सामील व्हायचे आहे असा दावा भाजप नेत्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
So Thackeray will not get a candidate in Mumbai either, claims Chandrakant Patil
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका