विशेष प्रतिनिधी
वाघोली : पुण्यातील वाघोली येथे एका आईने स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, याच घटनेत १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने ही मुलगी जीवघेण्या हल्ल्यातून बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही भीषण घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय (मूळ रहिवासी – कंधार, जिल्हा नांदेड), सध्या वाघोलीतील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेत ११ वर्षांचा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची १३ वर्षांची बहीण धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली आहे.
वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, हे टोकाचे कृत्य नेमके कोणत्या कारणामुळे करण्यात आले, याचा सखोल तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Mother Slits 11-Year-Old Son’s Throat in Wagholi; Daughter Critically Injured in Brutal Attack
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास