विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पंधरा वर्षापासून ज्यांच्यावर कुठलाही डाग नाही, खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिल्या जाते, अशा व्यक्तिमत्त्वावर टीका करताना स्वतःची पातळी एकदा संजय राऊत यांनी तपासली पाहिजे असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे. Sanjay Raut
महिला आरक्षण विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावर टीका करताना शिरसाट म्हणाले, दुसऱ्याच्या आशीर्वादावर जगणारे हे लोक दुसऱ्यांवर टीका करतात, लोक यांच्या वक्तव्याला कंटाळलेले आहे. सकाळी उठल्यावर यांचा भोंगा असाच बडबडत असतो म्हणून यांच्यावर लक्ष देऊ नका.
पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेली टीका हे वास्तव आहे. महिला आरक्षणामुळे लोकसभेच्या सीट वाढल्या असत्या, वेगवेगळ्या जाती धर्माच्या संख्या जास्त झाल्या असत्या, महिलांना मोठे स्थान मिळालं असतं, या विधेयकाच्या माध्यमातून मजबूत लोकशाही निर्माण होणार होती. पण काँग्रेसला ते नकोय. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका रास्ता आहे, असे शिरसाट म्हणाले.
शिवसेनाप्रमुख भाषणात काय बोलायचे? यांना शिवसेना प्रमुख यांचा विसर पडलाय. यांचा मानस फक्त काँग्रेस सोबत जाण्याचा झाला आहे काँग्रेस सोबत जायचं तर खुशाल जा. शिवसेना प्रमुखांचे नाव घ्यायची लायकी तुमची राहिली नाही. ज्या शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर काँग्रेसवर टीका केली, त्यांच्यासोबत हे गेले आहे.
बाळासाहेब आणि यांच्या विचारांमध्ये असलेले तफावत म्हणजे हे दलाल तयार झाले आहे. हे कधीकाळी शरद पवारांचा उदो उदो करायचे आज काँग्रेसचा उदो उदो करत आहेत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा उद्योग संजय राऊत करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
रोहित पवारांनी आपली उंची पाहून टीका करायला पाहिजे त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याचे काम नाही, असा टोलाही त्यांनी मारला.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर शिरसाट म्हणाले, भाजपाने कुणाला पोसलं, भाजपचं कुणाबद्दल काय मत आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आम्ही कुठल्याही टीका टिपणी मध्ये पडत नाही. ज्यांनी त्यांनी आपलं काम करावे, पण काम करत असताना समाजामध्ये आणखी कुठे तेढ निर्माण होणार नाही, अशी आमची त्यांना विनंती राहील.
Check your level before attacking modi, Sanjay Shirsat hits back at Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या