Monsoon : मान्सून महाराष्ट्रात दाखल, अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट

विशेष प्रतिनिधी

पुणे : Monsoon  मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे . गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.Monsoon

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.Monsoon



देशभरात नैऋत्य मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे.केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने आता तळ कोकणात प्रवेश करून महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासांत मान्सून अजून पुढे आगेकूच करणार आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रविवार 7 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल.

 

Monsoon arrives in Maharashtra; yellow alert issued for several districts

महत्वाच्या बातम्या