पुण्याची जागा न लढण्याबाबत तीनही पक्षांचा एकामताने निर्णय, सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील काही जागा न लढवण्याबाबत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्रित चर्चा करूनच निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला दगा दिल्याच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. Supriya Sule

सुळे म्हणाल्या की, ५ तारखेला सकाळी ११ वाजता मुंबईतील सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीला सर्व संबंधित नेते उपस्थित होते. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच पुण्यातील काही जागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी भूमिका घेतली किंवा आघाडीला दगा दिला, अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली. “मला तोंड उघडायला लावू नका. मी सुसंस्कृतपणे बोलत आहे. सध्या जो काही घोडेबाजार झाल्याची चर्चा सुरू आहे, तो कसा आणि का झाला हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

तसेच, निवडणूक प्रक्रियेत पैशाचा वापर होऊ नये, लोकशाही मूल्यांचे जतन व्हावे आणि कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने पैशाच्या जोरावर निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील सर्व निर्णय सामूहिक चर्चेनंतरच घेतले जात असून आघाडीत कोणताही मतभेद नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

All Three Allies Unanimously Decided Not to Contest Pune Seat, Clarifies Supriya Sule

महत्वाच्या बातम्या