NEET-UG Paper : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत; विद्यार्थिनीची सीबीआयकडून चौकशी

विशेष प्रतिनिधी

कल्याण : NEET-UG Paper  देशभरात गाजलेल्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रातील कल्याणपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कल्याणमधील एका विद्यार्थिनीची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पेपरफुटी प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.NEET-UG Paper

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष तपास पथकाने नुकतीच कल्याणजवळील म्हारळ परिसरातील एका विद्यार्थिनीच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा सविस्तर जबाब नोंदवला. तपास यंत्रणांनी विद्यार्थिनीच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, संपर्कातील व्यक्ती आणि संशयितांशी असलेले संभाव्य संबंध याबाबत माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे.NEET-UG Paper



तपासादरम्यान आधीच संशयितांच्या यादीत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्समधून (CDR) संबंधित विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक समोर आला होता. त्यानंतर सीबीआयने या संपर्काचा मागोवा घेत चौकशीची दिशा कल्याणकडे वळवली. या पार्श्वभूमीवर तपास पथकाने विद्यार्थिनीशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून माहिती संकलित केली.

मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनीचा पेपरफुटी प्रकरणात थेट सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तपास यंत्रणा केवळ तिचा संशयित विद्यार्थ्याशी असलेला संपर्क, त्याचे स्वरूप आणि त्या संपर्काचा पेपरफुटीशी काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात देशभरातील विविध राज्यांमध्ये सीबीआयकडून चौकशी सुरू असून अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीचे जाळे नेमके किती मोठे होते, त्यात कोणकोण सहभागी होते आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशा उपलब्ध करून देण्यात आल्या, याचा तपास अद्याप सुरू आहे.

कल्याणमधील विद्यार्थिनीची चौकशी ही त्याच तपासाचा एक भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NEET-UG Paper Leak Trail Reaches Kalyan; CBI Questions Student

महत्वाच्या बातम्या