विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray ईव्हीएम’ विरुद्ध ‘बॅलेट पेपर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जोपर्यंत निवडणुका मतपत्रिकांवर (बॅलेट पेपर) होत नाहीत, तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सूचनेचे स्वागत केले असून, हा मुद्दा थेट दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Raj Thackeray
वसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकींवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज ठाकरे यांची हीच भूमिका राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचीदेखील याला मान्यता असल्याचे संजय राऊत म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतल्याने अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या नाट्यमय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ झाला असल्याचा थेट आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
Raj Thackeray favours election boycott over EVMs, says Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या