विशेष प्रतिनिधी
मुंबई : Worli मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.Worli
उपनगरातील गोरेगाव पूर्वेला असलेल्या नेस्को सेंटरमध्ये 11 एप्रिल 2026 रोजी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या दोघांनीही अति प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. या घटनेचे पाळमुळं नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा पोलिसांनी तपास करत कारवाई केली. ज्यानंतर मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बंदी घालण्यात आली. परंतु, ही बंदी काही दिवसांपुरती आणि ही घटना लोकांच्या विस्मरणातून जाण्यापर्यंतच होती का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. कारण, या घटनेच्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा शहरातील प्रसिद्ध NSCI वरळी डोम येथेही लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, या तरुणाचा मृत्यू कशामुळे याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.Worli
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा वरळी डोम येथे लाईव्ह म्युझिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लाईव्ह कॉन्सर्टला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान मयत तरुण आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते. मद्याचा अतिरेक आणि प्रचंड गर्दीमुळे होणारी घुसमट यामुळे दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. नाचत असताना अचानक तो तरुण खाली कोसळला. ज्यानंतर या तरुणाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचे नाव वृषभ गांगुर्डे (वय 28) असल्याचे सांगण्यात येत आहे. वृषभ हा माहिम परिसरात रहात असून तो त्याच्या -मित्र मैत्रिणींसोबत या इव्हेंटला आला होता. वृषभने मोठ्या प्रमाणात मित्रांसोबत मद्यपान केले होते, असे सांगितले जात आहे. परंतु, या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
Young Man Dies During Live Concert in Worli
महत्वाच्या बातम्या