विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या धक्काबुक्कीचा वचपा काढण्याच्या मनस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभुराज देसाई असून त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच सामोरे जावे लागेल, असा दम त्यांनी भरला आहे. Shambhuraj Desai
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेदरम्यान शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली हाेती. सदस्य सभागृहात जात असताना हा प्रकार घडला हाेता. त्यावेळी शंभुराज देसाई जखमीही झाले हाेते. त्याच पार्श्वभूमीवर
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नाही. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच सामोरे जावे लागेल,” असे देसाई यांनी सुनावले आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर झालेला नाही.
विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराज देसाई उपस्थित नव्हते. याबाबत शंभूराजे म्हणाले, पालकमंत्री म्हणून नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री प्रयत्न करत असताना तुम्ही बैठकीला येत नाही आणि त्याचवेळी स्वबळावर लढण्याची घोषणा करता. मग आम्हालाही विचार करावा लागणारच.
शिवसेना अंतिम भूमिका घेण्यापूर्वी आपल्या स्थानिक सदस्यांचे मत जाणून घेणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून आता सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सदस्यांच्या भावना आणि भूमिका जाणून घेतल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवला जाईल. आमच्या सदस्यांचे मत काय आहे, हे समजून घेतल्यानंतरच पुढील निर्णय होईल. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ नेते अंतिम भूमिका ठरवतील, असे त्यांनी सांगितले.
शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
देसाई यांच्या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री Eknath Shinde काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊनच शिंदे पुढील रणनीती ठरवतील, असे संकेत देसाई यांनी दिले. त्यामुळे सातारा-सांगली मतदारसंघातील निवडणूक ही केवळ विधानपरिषदेची निवडणूक न राहता महायुतीतील समन्वय आणि नाराजीचीही कसोटी ठरणार आहे.
महायुतीसमोर नवा पेच
नाशिक आणि सातारा-सांगली या दोन मतदारसंघांतील निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः सातारा-सांगलीमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने भाजपच्या पाठीशी उभी राहणार की नाराजीचा संदेश देणार, हा मोठा प्रश्न आहे. शंभूराज देसाई यांच्या स्पष्ट शब्दांतील इशाऱ्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे
“Shambhuraj Desai Set to Settle Scores in Zilla Parishad President Election”
महत्वाच्या बातम्या