Bawankule : राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा; जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Bawankule राज्यातील शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शहीद जवानांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांच्या नावे शेतीची जमीन हस्तांतरित करताना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाBawankule

विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “शहीद कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे. आता महसूल विभागाकडून दिली जाणारी शेतीची जमीन वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांच्या नावावर करताना कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.”Bawankule



मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णयांची माहिती देताना बावनकुळे यांनी सांगितले की, माथेरान येथे पर्यटकांना पार्किंगची मोठी समस्या भेडसावत होती. ही समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागाची 5 एकर जागा माथेरान नगरपालिकेला पार्किंगसाठी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाशी संबंधित आदिवासी जमीन प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमध्ये नियमांचे पालन, संबंधितांना सुनावणीची संधी देण्यात आली का, तसेच तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असून, त्यानुसार सरकार योग्य ती कायदेशीर कारवाई करेल.

शिवसेनेतील राजकीय घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनाही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. “‘ऑपरेशन टायगर’शी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. पक्ष कसा चालवायचा किंवा वाढवायचा हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत विषय आहे,” असे ते म्हणाले.

Martyrs’ families get major relief as Maharashtra waives stamp duty on land transfers Bawankule

महत्वाच्या बातम्या