समृद्धी महामार्गावर इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरची कारला धडक, पाच जणांचा होरपळून मृत्यू

विशेष प्रतिनिधी

वर्धा : समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळजवळ एका धावत्या कारला इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत कारमधील पाचही जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. Ethanol Tanker



अपघातग्रस्त कार समृद्धी महामार्गावरून जात असताना, विरुळ परिसराजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव इथेनॉलच्या टँकरने या कारला जोरदार धडक दिली. टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील मानले जाणारे इथेनॉल असल्याने, धडकेनंतर पुढच्याच क्षणात मोठा स्फोट होऊन कारने भीषण पेट घेतला. कारला लागलेली आग एवढी वेगाने पसरली की आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाली आणि पाचही जणांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. Ethanol Tanker

अपघातात मृत्यू झालेले पाचही जण हे वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझवल्यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. Ethanol Tanker

अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील जळालेली कार आणि अपघातग्रस्त टँकर बाजूला सारल्यानंतर वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली.

Five Burnt Alive After Ethanol Tanker Hits Car On Samruddhi Expressway

महत्वाच्या बातम्या