विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुसंस्कृत राजकारणाचे दाखले देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा राेहिणी खडसे यांनी ‘चमच्या’ असे म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर बेलगाम टीका केली आहे. Atul Bhatkhalkar
रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका, असे खडसे यांनी म्हटले आहे.
आंदोलकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर अतुल भातखळकर म्हणाले हाेते की, कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेले आहे.
दरम्यान, दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याच्या घटनेचे रोहिणी खडसे यांनी निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, लोकशाहीवर हल्ला आहे.
Rohini Khadse calls Atul Bhatkhalkar a ‘chamcha’ in fiery attack
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका