विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. “यूँ बिछड़ा कि रुत ही बदल गई, एक शख़्स सारे शहर को वीरान कर गया…” या ओळींमधून सुरू होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय प्रवासातील संस्मरणीय क्षण आणि त्यांची घट्ट केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
व्हिडिओतील प्रमुख आणि मिश्कील प्रसंग
विधानभवनातील हशा पिकवणारा प्रसंग: व्हिडिओच्या सुरुवातीला विधानसभेतील एक जुना प्रसंग दाखवण्यात आला आहे. यामध्ये अजित पवार मिश्कीलपणे म्हणतात, “मागील अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. कुठलंच पद त्यांनी रिकामं ठेवलं नाही.” त्यांच्या या कोपरखळीवर सभागृहात एकच हशा पिकतो आणि खुद्द फडणवीसही मनमोकळेपणाने हसताना दिसतात.
पत्रकार परिषदेतील जुनी आठवण: महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या एका चर्चेत असणाऱ्या पत्रकार परिषदेची क्लिपही यात समाविष्ट आहे. शपथविधीबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी “संध्याकाळपर्यंत माझ्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत समजेल,” असे म्हटले होते. त्यावर अजितदादांनी तात्काळ मिश्कील उत्तर देत, “त्यांचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी मात्र शपथ घेणार आहे,” असे म्हटले होते. त्यांच्या या हजरजबाबीपणाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
”अजितदादा हे माझे दादाच होते…”
अजित पवारांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना या व्हिडिओचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले:
”अजितदादा हे खऱ्या अर्थाने माझे दादाच होते. माझा आणि त्यांचा जन्म २२ जुलैलाच झाला. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. अंतःकरणातून प्रेम करणारा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनीही माझ्याकडे तसंच पाहिलं. आमचं नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते जिव्हाळ्याचं होतं.”
या भावूक व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी अजितदादांसोबतच्या सहवासातील अनेक अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
They were truly my Dada…”: CM Fadnavis shares an emotional video on Ajit Dada’s birth anniversary!
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका