विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : Mumbai Municipal Corporation यांनी महायुतीतील घटक पक्षांना इशारा दिला.रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, आमचा पक्ष जागतिक पातळीवर मोठा पक्ष आहे. अजून मोठा पक्ष व्हावा यासाठी हे नोंदणी अभियान सुरु आहे. भाजपाचे चांगले दिवस आहेत, त्याचे तुम्ही स्वागत केलं पाहिजे. लोकांना विकास दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल इतकी भाजपची मुंबईत ताकद आहे.Mumbai Municipal Corporation
नितेश राणे यांच्या मंत्री पदावर राणे म्हणाले, कॅबिनेट मंत्र्याला जरी एक खातं दिले असेल तरी तो सगळ्या विभागावर बोलू शकतो. मत्स व बंदर खातं सांभाळण्यासाठी नितेश राणे सक्षम आहेत
रत्नागिरीत बांगलादेशी जन्म दाखला दिला गेल्याच्या प्रकरणावर ते म्हणाले, ज्याने बांगलादेशीला जन्माचा दाखला दिला त्या अधिकार्यावर कारवाई व्हावी
शरद पवारांचे आरएसएसने कौतुक केल्यास त्यात वावगे काही नाही. चांगल्याला चांगले म्हणण्यामध्ये काहीच वाईट नाही, फक्त डोळे असून चालत नाही, डोळसपणा लागतो, असा टोला त्यांनी मारला.
दरम्यान, संजय राऊत यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
जे दिल्ली विधानसभेत घडलं ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये देखील घडू शकतं. लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असते, असे ते म्हणाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राणे यांनीही स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
BJP’s strength is such that Mumbai Municipal Corporation will fight on its own, believes Narayan Rane
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली