मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई: तस्करीप्रकरणी भाजप नेत्यासह पाच जणांना अटक, 5 कोटी रुपयांचे सोने जप्त
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने सोने तस्करीविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याच्यासह













