विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एका बाजुला जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू असताना संसदेत मात्र विराेधी पक्षांमध्येच जुंपली आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्यावरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे. काॅंग्रेसने भाजपसाेबत गुप्त डील केल्याचा आराेप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. यावरून त्यांची आणि काॅंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांच्यात बाचाबाची झाली. Congress
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये गुप्त ‘डील’ झाल्याचा थेट आरोप केला. यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित होताच संसदेच्या बाहेर अखिलेश यादव आणि काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्यात बाचाबाचीचा प्रकार घडला आहे. चर्चा सुरू असताना अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची संधी दिली.
मात्र, समाजवादी पक्षाला बोलू न दिल्याने अखिलेश यादव भडकले. अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यांना उद्देशून अखिलेश म्हणाले, हा विषय कोणत्या एका पक्षाचा नसून देशातील तरुणांच्या भविष्याचा आहे. तुम्ही यांना आणि त्यांना बोलू दिले, मग आमचे काय? तुमची आपापसात काही तडजोड झाली आहे का?” असा सवाल केला.
अखिलेश यांच्या या ‘डील’च्या आरोपावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल नाराज झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृह स्थगित झाल्यानंतर वेणुगोपाल यांनी संसदेबाहेर अखिलेश यादव यांना अडवून जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे नंतरही घेतले जाऊ शकतात. पण आधी २० जुलैला आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जो रानटी लाठीमार केला, डोकी फोडली आणि कपडे फाडले, त्यावर आम्हाला सरकारकडून उत्तर हवे आहे”, असे यादव यांनी वेणुगोपाल यांना सुनावले.
मंगळवारी ‘आप’ नेते संजय सिंह यांनीही काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले होते. भाजपने जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलन करण्याची परवानगी दिली, असा थेट आरोप संजय सिंह यांनी केला होता.
INDIA Bloc Rift Over NEET Paper Leak: Samajwadi Party Accuses Congress of Secret Deal with BJP
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका