विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहादनंतर मुंबईतही असाच कथित प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथे १९ वर्षीय तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ करणाऱ्या अश्रफ सिद्दिकीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मुंबई पालिका प्रभाग क्रमांक २०१ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा आहे. woman alleges harassment
पीडित तरुणी आणि आरोपी हे मुंबईतील एका छोट्या कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या दरम्यान आरोपी अश्रफ सिद्दिकी याने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर मिळवले होते. या नंबरचा वापर करून तो मुलींना टार्गेट करत होता.
त्याने पीडित तरुणीला त्याने सतत फोन कॉल्स आणि व्हॉट्सॲपवर अश्लील मजकूर पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. धक्कादायक म्हणजे, मेसेजमध्ये त्याने मला हिंदू मुलीच आवडतात असे विधान करत तिचा मानसिक छळ केला. केवळ मेसेजवर न थांबता आरोपीने या तरुणीचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे.
आरोपीने केवळ एकाच तरुणीला नाही, तर इतर ३ ते ४ हिंदू मुलींनाही अशाच प्रकारचे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले होते. भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी या घटनेवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप केला आहे. तसेच अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणानंतर पीडित तरुणीने वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी अश्रफ सिद्दिकी याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हे जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचे आहे. मुलींना जाळ्यात ओढण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत. जर एखादी तरुणी प्रतिसाद देत नसेल, तर तिला असा त्रास देणे हे नीच मानसिकतेचे लक्षण आहे. पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपीला अटक केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पालकांनी आणि मुलींनी न घाबरता अशा नराधमांविरोधात समोर येऊन तक्रार करावी, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत.
After Nashik, woman alleges harassment via obscene messages in Mumbai workplace
महत्वाच्या बातम्या