Mayor Gayatri Bhangale : भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Mayor Gayatri Bhangale मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. रजनी सावकारे आणि त्यांचे इतर सहकारी आपल्याला वैध जात प्रमाणपत्र मिळू नये म्हणून बनावट कागदपत्र उत्तर प्रदेशमधून आणत असल्याचा आरोप केला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी पराभव केला होता.Mayor Gayatri Bhangale

गायत्री भंगाळे यांनी आपल्या काही नगरसेवकांसह अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेत निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्याविरुद्ध जात पडताळणी विभागाकडे जात प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत तक्रार आधीच दाखल आहे. मंत्री संजय सावकारे यांनी देखील गायत्री भंगाळे यांना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता.Mayor Gayatri Bhangale



आपले जात प्रमाणपत्र वैध ठरू नये किंवा आपल्याला वैध जात प्रमाणपत्र मिळूच नये म्हणून म्हणून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे ह्या आपल्या सहकाऱ्यांसह मिळून उत्तर प्रदेश मधून बनावट कागदपत्रे आणत असल्याचा आरोप भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी केला आहे. तसेच जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांची देखील दिशाभूल करत असल्याचा आरोप गायत्री भंगाळे यांनी केला आहे. मंत्री

गायत्री गौर-भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा आरोप मंत्री संजय सावकारे यांनी केला होता. महाराष्ट्रात गौर समाज एससी प्रवर्गात येत नसताना देखील भुसावळच्या नवनीवाचित नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना प्रांताधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र दिल्याची बाब संशयास्पद असल्याचा आरोप संजय सावकारे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक झाल्या आहेत.

Bhusawal Mayor Gayatri Bhangale Seeks FIR Against Minister Sanjay Savkare’s Wife Rajni Savkare

महत्वाच्या बातम्या