निरंजन शेरकर
नाशिक:शहरात गाजत असलेल्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आरोपींबाबत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. अंडरकव्हर ऑपरेशन नंतर उघडकीस आलेल्या प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केल्या असून काहींना अटक केली आहे,तर या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार असल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.या आरोपींवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
एकूण किती जणांवर गुन्हे?
या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या एफआयआर मध्ये त्यांच्यावर बलात्कार,लैंगिक छळ, स्टॉकिंग ,फसवणूक आणि धार्मिक भावना दुखावण्यासारख्या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची पार्श्वभूमी काय आहे?
नाशिकमधील गाजत असलेल्या आयटी कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या तपशीलांनुसार, या प्रकरणातील काही आरोपी कंपनीत विविध पदांवर कार्यरत होते. यामध्ये दानिश एजाज शेख (वय ३२) हा ‘डायलर/एसएमएस मेसेंजर’ पदावर कार्यरत असून २०१८ पासून कंपनीत नोकरी करत होता, तर त्याची पार्श्वभूमी घरगुती व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तौसिफ बिलाल अत्तार (वय ३०) हा २०२० पासून कंपनीत कार्यरत असून त्याचा फूटवेअर व्यवसायाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रझा रफिक मेमन (वय ३५) हा ‘टीम लीडर – क्रेडिट अँड कलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट’ या पदावर कार्यरत होता आणि २०२१ पासून कंपनीत काम करत असल्याचे समजते. याशिवाय शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (वय ३४) हा ‘असोसिएट’ पदावर कार्यरत असून २०२० पासून कंपनीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.रफी शेख ( वय ३६) हा बिझनेस प्रोसेस अनॅलिस्ट पदावर कार्यरत असून तो 2017 पासून कंपनीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तर आसिफ आफताब अन्सारी ( वय २२ ) हा असोसिएट पदावर कार्यरत असून तो २०२४ पासून कंपनीत कार्यरत आहे.तर निदान एजाज खान ( वय २५ ) संबंधित कंपनीत फायनान्स वर्ल्ड मध्ये कार्यरत असून 2021 कंपनीत कार्यरत आहे, तर तिचे पती हे खाजगी कंपनीत नोकरी करतात.
निदा एजाज खान मुलींना ‘ हिजाब ‘ घालण्यास शिकवायची…
आरोपींच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आणि धर्मांतरण केलेल्या हिंदू मुलींना अडकविण्यासाठी निदा खानची भूमिका मुख्य होती. हिंदू मुलींचा ब्रेनवॉश ती करत असे.तसेच हिंदू मुलींना हिजाब घालण्याचे महत्व पटवून देत,त्यांना हिजाब घालण्याचे प्रशिक्षण देखील देत असे.
Hijab, brainwashing and exploitation! Background of the accused in the Nashik case…
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..