Pratap Sarnaik : मराठी सक्तीच्या निर्णयावरून वाद तीव्र, रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Pratap Sarnaik रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता किंवा लिहिता येणे बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात कडक भूमिका घेत, येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.Pratap Sarnaik

या निर्णयानंतर रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विविध संघटनांनी याला उघडपणे विरोध केला आहे. रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी या निर्णयाला अन्यायकारक ठरवत, भाषेच्या नावाखाली कामगारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.Pratap Sarnaik



दरम्यान, या वादात आता गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या ‘कष्टकरी जनसंघा’च्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट कमिशनर कार्यालयात जाऊन या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करत, कामगारांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक, सामाजिक किंवा प्रशासकीय दबाव टाकू नये, अशी मागणी केली.

सदावर्ते यांनी यावेळी सांगितले की, १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशा दिवशी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारे निर्णय घेणे हे अन्यायकारक आणि संविधानविरोधी आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा देत, रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कोणतीही बेकायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी, अशी मागणी केली.

या निर्णयाला विविध कामगार संघटनांकडूनही विरोध वाढत असून, भाषा ही संवादाचे माध्यम असावी, दडपशाहीचे साधन नसावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. प्रशासनाने या संदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आंदोलकांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत: मराठी सक्तीच्या नावाखाली कोणतीही बेकायदेशीर कारवाई तातडीने थांबवावी चालकांचे परवाने किंवा बॅज रद्द करताना कायदेशीर प्रक्रिया पाळावीप्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करून अफवांना आळा घालावा. १ मेपासून कोणत्याही चालकावर अन्यायकारक कारवाई होणार नाही, याची खात्री द्यावी

Marathi mandate sparks row, auto and taxi drivers protest against government

महत्वाच्या बातम्या