पक्ष विलीन करा तरच आमदारकी, शिवसेना शिंदे गटाची बच्चू कडू यांना अट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रहार जनशक्ती पार्टीचे विलीनीकरण करण्याच्या अटीवर या पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची जागा देण्याची ऑफर करण्यात देण्यात आली आहे. याबाबत कडू हे मंगळवारी भूमिका जाहीर करणार आहेत. Bachchu Kadu

बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मेसेजेस करून त्यांची मते मागविली आहेत. कडू यांना उमेदवारी देण्यास शिवसेना शिंदे गटाती नेते, मंत्री, आमदारांचा विरोध असल्याचे म्हटले जाते. पक्षाबाहेर राहून त्यांना आमदार केले तर ते आम्हालाच त्रास देतील, असे विदर्भातील नेत्यांचे म्हणणे आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू हे राज्यमंत्री हाेते. मात्र, शिवसेनेतील बंडाच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे गटातील बहुतांश आमदार आसाममधील गुवाहाटी येथे नेण्यात आले हाेते. यावेळी बच्चू कडू हे त्यांच्यासाेबत गुवाहाटीला गेले हाेते. मात्र, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही.


त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे तसेच महाविकास आघाडीशी फारकत घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे यांच्यासाेबत परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विराेधात परिवर्तन विकास आघाडी लढली. मात्र, या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. आचलपूर विधानसभा मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू यांचाही पराभव झाला.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर दिली. तरीही अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष तसेच आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी त्यांचा असलेला वाद वाढत गेला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने विधानपरिषद देण्याची तयारी दर्शविली असली तरी भाजपला ते मान्य हाेणार का? हा प्रश्न आहे.

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठीची निवडणूक आणि एका जागेची पोटनिवडणूक ही १२ मे रोजी होणार आहे. २८ किंवा २९ एप्रिलला भाजपचे उमेदवार दिल्लीहून जाहीर होतील. १० पैकी ६ जागा भाजपच्या वाट्याला, शिवसेना शिंदे गटाला २, राष्ट्रवादीला (अजित पवार गट) एक आणि मविआला एक जागा मिळेल.

Merge your party or lose MLA post: Shiv Sena Shinde faction sets condition for Bachchu Kadu

महत्वाच्या बातम्या