बारामतीकरांना आदेश देता येत नाही, विनंती करावी लागते; रोहित पवार यांची सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी कोपरा सभा

विशेष प्रतिनिधी

बारामती : अजितदादांचे काम बारामतीकरांना माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून शंभर टक्के मतदान सुनेत्रा पवार यांनाच व्हावे,” अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नागरिकांना केली. मात्र, “बारामतीकरांना आदेश देता येत नाहीत, त्यांना फक्त विनंतीच करता येते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. Rohit Pawar

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी कोपरा बैठकीतून सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडली आहे.



यावेळी रोहित पवार म्हणाले की, “मी प्रचारासाठी नव्हे, तर लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलो आहे. अजितदादांबद्दल असलेला आदर आणि त्यांनी केलेल्या कामामुळे आम्ही सर्वजण प्रचारात सहभागी होत आहोत.” पवार कुटुंब एकत्र येऊन प्रचार करत असलेला काळ चांगला होता, मात्र सध्याची परिस्थिती दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच कोणत्या हेतूने काही पक्ष मदतीला येत आहेत हा वेगळा मुद्दा आहे. पण बारामतीकरांनी ठरवले आहे की, सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहायचे.” बाहेरून आलेल्या उमेदवारांना बारामतीतून फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शरद पवार साहेबांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे काँग्रेसनेही माघार घेतली. त्यामुळे प्रमुख पक्ष रिंगणात नाहीत, यात पवार साहेबांचा मोठा वाटा असल्याचे रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar at Corner Meeting Campaigning for  unetra Pawar

महत्वाच्या बातम्या