विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी आणि निकषांवर अनेक शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक बदल करावेत, असा सल्ला राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. Sharad Pawar
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, सध्याच्या निकषांमुळे अनेक पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन निर्णयातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. लोकशाहीत सरकारने लोकांशी संवाद साधला पाहिजे. लोकांच्या अडचणी समजून घेत निर्णयात आवश्यक बदल करण्याची तयारी दाखवली पाहिजे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वतः पुढाकार घेण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निकषांमध्ये सुधारणा करता येते का, यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पवारांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
दिल्लीमध्ये होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत ते म्हणाले, देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगत त्यांनी ती कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयासाठी नाही. ही एक जनरल रिव्ह्यू मीटिंग आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका तातडीने नसल्याने विरोधी पक्षांकडे संघटन बळकट करण्यासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. आघाडीतील काही पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान विरोधकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पवार यांनी अधोरेखित केले.
Sharad Pawar Urges Government to Revise Farm Loan Waiver Criteria
महत्वाच्या बातम्या