विशेष प्रतिनिधी
पुणे: सोमवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरलेली वंदे भारत एक्सप्रेस तब्बल ६-७ तासांच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर मध्यरात्री अडीच वाजता पुन्हा रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. मात्र, या एका अपघातामुळे रेल्वेच्या वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, आजही अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. Vande Bharat
नेमका घटनाक्रम काय?
सोमवारी रात्री सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे तीन डबे पुण्याजवळ रुळावरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने रात्रभर काम करून पहाटे ३ च्या सुमारास ही ट्रेन रुळावर आणली आणि मार्ग मोकळा केला.
रेल्वे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे मेगाहाल
या अपघाताचा फटका आजही बसत असून महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे.डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस आज सकाळी या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर काल रात्री अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, लोणावळा आणि खडकी स्थानकांवर २ ते ३ तास थांबवून ठेवण्यात आले होते.मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाला बदलावा लागले आहे.
स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मध्यरात्री अचानक गाड्या थांबल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि बसण्यासाठी जागा नसल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. अनेक प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरच रात्र काढली. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरी प्रवाशांमधील नाराजी कायम आहे. सध्या वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘Vande Bharat’ finally on track at 2:30 midnight
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल