विशेष प्रतिनिधी
परभणी: जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे पक्ष सोडणार असल्याचा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत.’ सध्या तरी मी पक्षात आहे, पण पुढचं सांगता येत नाही’,असे विधान करत पक्षांतराच्या चर्चांना दुजोरा दिला होता.
मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांचे निकटवर्तीय गंगाप्रसाद अनेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती.मात्र उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले होते.
संजय जाधव यांच्या भूमिकेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिह्यातील शिवसेनेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.परभणी जिल्हाप्रमुखांच्या बदलीनंतर आता जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील विधानसभाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,शहरप्रमुख, शहर संघटक आणि युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा समावेश आहे.
कल्याणराव रेंगे पुन्हा सक्रिय…
पाथरी विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार मीराताई रेंगे यांचे पती आणि शिवसेना नेते कल्याणराव रेंगे हे पुन्हा एकदा जिल्हा आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कल्याणराव रेंगे यांच्या खांद्यावर पाथरी विधानसभा प्रमुख पदाची धुरा देण्यात आली आहे.
दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जिह्यात जवळपास ३० पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Thackeray Sena’s new team after Jadhav’s displeasure; New office bearers announced in Parbhani…
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध