विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tatkare-Pawar राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट मानली जात असून, तिच्या राजकीय अर्थांबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.Tatkare-Pawar
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदल, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रातील नावांचा अभाव आणि पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर कायम आहेत की नाहीत, याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळेही या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.Tatkare-Pawar
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. “शरद पवार साहेबांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी वेळ मागितली होती. आज वेळ मिळाल्याने मी त्यांना भेटायला आलो,” असे तटकरे म्हणाले. तसेच या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडींशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
तटकरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले, तरी तिच्या टायमिंगमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आसाम दौरा एकत्र केला होता. त्या दौऱ्यातून अजित पवार गटात सर्व काही सुरळीत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात होते.
मात्र, त्या दौऱ्यानंतर लगेचच तटकरे यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील भविष्यातील संभाव्य बदल, अंतर्गत समीकरणे किंवा विलिनीकरणाच्या चर्चांशी या भेटीचा काही संबंध आहे का, याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना या भेटीमुळे नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
NCP Buzz Intensifies After Tatkare-Pawar Meeting at Silver Oak; Signs of New Political Equations?
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी