विशेष प्रतिनिधी
बारामती : चार महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होते. दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्याने ते गोजुबाबी गावाजवळ कोसळले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसर बंदोबस्ताखाली घेण्यात आला आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे विमान कोसळले, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, याच गोजुबावी गावाच्या परिसरात चार महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Training Aircraft Crashes in Baramati; Revives Memories of Ajit Pawar’s Plane Accident Four Months Ago
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी