संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊत यांची पोलीस आयुक्तांकडे मागणे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर हत्या आणि दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाच जणांच्या हत्ये संदर्भात धक्कादायक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली आहे. Sanjay Raut

राऊत यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, शिवसेनेपासून फुटलेल्या खासदारांविरोधात महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड संताप असून, लोक सर्वत्र आंदोलने करत आहेत. या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय पाटील यांनी आंदोलकांना जीवे मारण्याची आणि त्यांच्यावर बॉम्ब फेकण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या वक्तव्यांचा हवाला देत म्हटले आहे की, पाटील यांनी उघडपणे धमकी दिली आहे की, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापूर्वी लोकांनी जीवन विमा काढावा, कारण ते त्यांना थेट स्मशानभूमी किंवा रुग्णालयात पाठवतील. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, पाटील यांनी यापूर्वीही पाच जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीजबाबाच्या आधारे, ते पाच जण कोण होते, पाटील यांनी त्यांची हत्या केव्हा आणि का केली, याचा पोलिसांनी तात्काळ तपास करावा आणि पाटील यांच्याविरुद्ध तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.



पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, खासदार संजय पाटील यांनी आंदोलकांच्या घरात घुसून त्यांची हत्या करण्याची आणि त्यांच्यावर बॉम्ब फेकण्याची धमकी दिली आहे. खासदारांच्या बॉम्बच्या धमकीवर तीव्र चिंता व्यक्त करत, राऊत यांनी मागणी केली की पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या घराची झडती घ्यावी आणि या तपासात दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) मदत घ्यावी. जर हे बॉम्ब एखाद्या दहशतवादी गटाकडून मिळाले असतील, तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे, पाटील यांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या (यूएपीए) अंतर्गत अटक करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले की, खासदार पाटील यांच्या वक्तव्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई केली नाही, तर जनतेच्या संरक्षणासाठी त्यांना न्यायालयात जावे लागेल. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, या काळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास किंवा त्याची हत्या झाल्यास, त्यासाठी संजय पाटीलच पूर्णपणे जबाबदार असतील.

Sanjay Raut Demands FIR Against Sanjay Dina Patil

महत्वाच्या बातम्या