Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रात टाळली तटकरे, पटेल यांची पदे

विशेष प्रतिनिधी

Sunetra Pawar  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा राजकीय निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना झटका दिला आहे.Sunetra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात केवळ दोनच महत्त्वाच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ तर शिवाजीराव गर्जे यांचा ‘खजिनदार’ असा उल्लेख आहे.Sunetra Pawar

विशेष म्हणजे, या पत्रात एकूण 14 पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी देण्यात आली असली तरी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह इतर 12 नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रमुख नेत्यांच्या पदनामाबाबत ठेवलेली ही गोपनीयता राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.Sunetra Pawar



 

अजित पवार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदनामांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच पाठवलेल्या नव्या पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांपुढे कोणत्याही पदाचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी आणि संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असते. या प्रक्रियेचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले. मात्र, या पत्रात केवळ सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ आणि शिवाजीराव गर्जे यांचा ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ आणि सुनील तटकरे यांची ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. असे असतानाही निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकृत पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पदनामांचा उल्लेख का टाळण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sunetra Pawar Omits Tatkare and Patel’s Posts in Letter to Election Commission

महत्वाच्या बातम्या